शनिवार, १७ एप्रिल, २०२१

विणकरांना प्रोत्साहन देणारी मृण्मयी अवचट !















 


डोळ्यांनाही न दिसणाऱ्या कोरोना नामक विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली आणि जे जागतिक पातळीवर झाले तेच देश, राज्य, शहर आणि गाव पातळीवर झाले. अनेक उद्योगांचे भविष्य धूसर झाले. हातमाग वस्त्रोद्योगही यात भरडला गेला. हातमागावर काम करणारे कारागीर आणि विणकर यांच्या हातातले काम थांबले. भारतातील वस्त्रोद्योगाला खूप मोठा इतिहास आणि दैदिप्यमान परंपरा आहे. भारतात हातमागावर विणल्या जाणाऱ्या वस्त्रांमधील वैविध्य जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही नाही. या परंपरेचं जतन केलं तर या कला जगतील ! आज देशातला विणकर अडचणीत आहे त्याला सक्षमपणे उभे करण्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे असा विचार मुंबईमधील विलेपार्लेतील मृण्मयी अवचटने केला.  

२० वर्षांपासून मृण्मयी, फॅशन जगतात खूप नवनवीन प्रयोग करते आहे. 'वॉल्ट डिस्ने कन्झ्युमर प्रॉडक्ट्स' मध्ये 'क्रिएटिव्ह हेड'  म्हणून अत्यंत कल्पकतेने ५ वर्षे काम केल्यानंतर एक आई म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देऊन तिने जॉब सोडला आणि मग ‘abp माझा’च्या ‘घे भरारी’ या कार्यक्रमात ‘लाईफ स्टाईल’च्या भागांमध्ये ‘फॅशन एक्स्पर्ट’ म्हणून काम करता करता ती इतरही अनेक मोठ-मोठ्या फॅशन लेबलसाठी काम करत होती. हे सगळं करत असतांना ती पारंपरिक विणकाम करणाऱ्या विणकरांना प्रोत्साहन देण्याचे काम पण करत होती.

नोकरी सोडल्यावर मृण्मयीने पार्ल्यात ‘Nikayi’ नावाचा स्वतःचा ‘Fashion Studio’ आणि ‘Web Store’ सुरु केलं. Clothing मध्ये ‘Made to order’ च्या section मध्ये तिच्या डिझाईन्सची उल्लेखनीय दखल घेतली गेली. पण या बरोबरच पारंपरिक विणकरांना योग्य मोबदला मिळावा म्हणून तिने त्यांच्याकडून तिच्या डिझाईनच्या हॅन्डलूम साड्या बनवून घेतल्या आणि फक्त Operational Margin ठेऊन त्या साड्या ती ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. साड्यांबरोबरच ती सुंदर हॅन्डलूम फॅब्रिक्स पण बनवून घेत आहे. त्यामुळे विणकरांना त्यांच्या कलेला आणि कष्टांना योग्य तो न्याय आणि मोबदला मिळत आहे. असे ती गेली १० वर्षे करत आहे. तिच्याकडच्या सुंदर हॅन्डलूम साड्यांचे कलेक्शन बघून अनेक सिनेतारकांनी तिच्याकडून साड्या घेतल्यामुळे मृण्मयीशी जोडले गेलेल्या विणकरांना प्रोत्साहन मिळत गेले.

मृण्मयी म्हणाली, “हातमागावरचे Authentic fabric  मला urban life style  मधल्या चोखंदळ आणि अभिरुचीसंपन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आहे. त्यासाठी मी सध्या urban life style मध्ये पसंत पडेल अशी fabrics, विणकरांकडून बनवून घेत आहे.

शिवाय मृण्मयी, प्रत्यक्ष विणकरांचे काम कसे चालते, कितीतरी टप्प्यांमधून एखादे कापड किंवा साडी कशी विणली जाते इत्यादी गोष्टी दाखवण्यासाठी आणि टुरिझमच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक विणकरांना उत्पन्नाचा अजून एखादा स्त्रोत सुरु व्हावा म्हणून, महेश्वराला नर्मदा नदीजवळ दोन दिवसांची weekend, trail सुद्धा आयोजित करत असते. ते सगळं बघून तिच्याबरोबर गेलेल्या बायका परत येतांना वस्त्रोद्योगाबद्दल एक प्रचंड मोठा आदर घेऊन परत येतात. 

पण कोरोना महामारीमुळे गेले वर्ष - दीड वर्ष मात्र सगळ्याच व्यवसायांची घडी विस्कटली आहे. विणकरांचे काम थांबले. त्यांना परत सक्षमपणे उभे करण्यासाठी मृण्मयीने ‘Support Weavers Drive’ साठी काही सिनेतारकांना मदत मागितली. अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर तिच्या या उपक्रमाने भारावले गेले आणि त्यांनी लगेच एक Social Cause म्हणून त्या drive ला support पण केला आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ! हा drive, लेखनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुखदाने मला विचारले, मीही गेले काही महिने या विणकरांच्या पुनरुज्जीवनासाठी काम करते आहे त्यामुळे मीही या drive ला जोडले गेले. निरनिराळ्या ‘Indian Weaves’ वर गेले काही महिने मी माझ्या ब्लॉगवर लिहिते आहे आणि या drive च्या निमित्ताने विणकरांवर लिहिण्याचाही हा योग आला.

अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर या उपक्रमाला मदत म्हणून आपापल्या अत्यंत व्यस्त शेड्युलमधून फोटोशूटसाठी तत्काळ तयार झाले. सुखदा आणि अभिजितने एक महिना आधीच ठरवून फोटो शूटसाठी एक दिवस राखून ठेवला होता. हातमागावरच्या मध्यप्रदेशातील महेश्वरी आणि पश्चिम बंगालच्या फुलीया साड्या आणि मंगलगीरी कॉटनच्या कुर्त्यांसाठी, नववर्षाचे औचित्य साधून, गुढीपाडव्याच्या आधीच गुढी उभारून फोटो शूट केले गेले. त्यातील काही फोटो गुढीपाडव्याला रिलीज केले आणिSocial Media तून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.   


  मृण्मयी दीड वर्षापूर्वीच ‘Men’s Wear Line in Handloom’ सुरु करणार होती पण कोरोना काळ आणि lockdown मुळे ती गोष्ट लांबत चालली होती पण अभिजितमुळे तिचा हा उपक्रम आता गुढीपाडव्यापासून सुरु झाला. मृण्मयीने अभिजितसाठी सुंदर हॅन्डलूम फॅब्रिक मध्ये पारंपरिक ड्रेस डिझाईन केले. मृण्मयी म्हणाली, “हॅन्डलूमचा वापर फक्त स्त्रियांसाठी सिमित न राहता, पुरुषांचे कपडेही हॅन्डलूम फॅब्रिक मध्ये खूप सुंदर बनतात, हे लोकांपर्यंत मला पोहोचवायचे आहे !”.... आणि खरच मृण्मयीने अभिजितसाठी डिझाईन केलेले ड्रेस अतिशय सुंदर झाले आणि अभिजितला पण ते प्रचंड आवडले. मृण्मयी म्हणाली, “अभिजित खूपच receptive होता, कोणत्याही पॅटर्नचा, कोणत्याही रंगाचा, कोणत्याही फॅब्रिकच्या वापरासाठी तो तयार होता !” गुढीपाडव्याला रिलीज झालेल्या फोटोत त्याने घातलेला कुर्ता अतिशय सुंदर rustic colour मधला हॅन्डलूम मंगलगिरी फॅब्रिकचा असून त्यावर मृण्मयीने तिच्या studio  मध्ये ‘जर’, beads, काचेचे मोती वगैरे लावून जरदोसी पद्धतीने हाताने भरतकाम करून त्याला एक ‘classy look’ आणलाय आणि त्यावर तिने शिवलेल्या पतियाळा धोतरामुळे हँडसम अभिजितला एक ‘राजबिंडा लूक’ आला ! मृण्मयीने अभिजितसाठी डिझाईन केलेले बाकीचे ड्रेस पण एकसेएक झाले आहेत.

शिवाय सुखादाचे अभिजात सौंदर्य खुलले आहे ते मृण्मयीने तिच्या विणकरांकडून डिझाईन करून घेतलेल्या हॅन्डलूम साड्यांमुळे ! गुढीपाडव्याला रिलीज झालेल्या फोटोत सुखदाने नेसलेली पिवळी महेश्वरी साडी, मृण्मयीने मलबेरी सिल्कमध्ये बनवून घेतली आहे. खरतर महेश्वरी साड्या जास्त करून कॉटनमध्ये किंवा कॉटन आणि सिल्क अशा मिक्स धाग्यामध्ये बनतात. पण मृण्मयीने खास ही महेश्वरी साडी पूर्ण सिल्कमध्ये बनवून घेतली आहे. अतिशय तलम धाग्यात बनलेली ही साडी खूप सुंदर ‘ड्रेप’ होते. काठात आणि  बुट्ट्यांमध्ये पारंपरिक ‘रुद्राक्ष motif’ मुळे साडी अजूनच खुलते आहे. विशेष म्हणजे कॉटनच्या महेश्वरी साड्या सुद्धा अतिशय खानदानी दिसतात कारण त्या साड्यांवर नर्मदेकाठच्या सुंदर मंदिरांवरील कोरीवकामाचा आणि विलोभनीय नैसर्गिक घटकांचा प्रभाव पडलेला दिसतो.

शिवाय सुखदाने नेसलेली काळी कॉटनची पैठणी म्हणजे तर एक master piece आहे. कॉटनच्या पैठण्या १० वर्षांपूर्वीच मृण्मयीने विणकरांकडून विणून घ्यायला सुरुवात केली होती. या पैठण्या अतिशय ग्रेसफुल दिसतात आणि ‘Corporate World आणि सिनेताराकांकडून या पैठण्यांना खूप मागणी असते. शिवाय 'ॲनिमल राईट्स’चा कट्टर पुरस्कार करणाऱ्या स्त्रिया, ‘सिल्क वर्म्स’ना हानी पोहोचते म्हणून सिल्कच्या साड्या वापरत नाहीत त्यांच्यासाठी हा कॉटनच्या पैठण्यांचा पर्याय म्हणजे एक ‘amazing option  आहे ! अशा मुली विशेष करून जैन समाजातील मुली स्वतःच्या लग्नात या भरजरी कॉटन पैठण्या मृण्मयीकडून बनवून घेत आहेत. 



 या हॅन्डलूम साड्या पाहिल्यावर विणकरांच्या कलेला सलाम करावासा वाटतो ! विणकरांच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा या कले ला जोपासावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या मृण्मयीचे मनापासून कौतुक !

 Last but not the least :

Salute to Sukhada and Abhijeet Khandakekar for their ‘Selfless Gesture ! ’

Lots of Best wishes to Mrunmyi Avachat for her ‘Support Weavers Drive’

 


©Rashmi Vinod Satav
    rashmisatav@gmail.com

instagram.com/abhijeetkhandkekar

instagram.com/morpankh

concept & Design : instagram.com/mrunmayiavachat

Makeup & Hair instagram.com/kshitijedwankar

Photography: instagram.com/photo_vinayak

Jewellery : instagram.com/adityaartjewellery

Location & Outfit : instagram.com/ nikayifashionstudio

Beautiful Gudhi Vastra : instagram.com/sajaawat_collection

#Sareelove #sarees #sareesofinstagram #offwhite #iwearhandloom #abhijeet #sukhada #abhisukhada #marathi #supportlocalartisans #vocalforlocal   #handcrafted #handmade #authentic #fairprice #Bridal #Wedding #Festivevibes #ethnic #sareephotography #fashion #gudhipadwa2021

#GudiPadwa #indianwear #festive #saveourweaves

 


२ टिप्पण्या:

  1. खूपच सुंदर ! तुम्ही या क्षेत्रात करत असलेल्या प्रयत्नांना सलाम. विणकर आणि कलाकार यांना या कठीण परिस्थितीत तुमच्यासारख्या धडपडणाऱ्या कलाकारानी केलेल्या मदतीला शतशः धन्यवाद. असेच सुंदर व जगण्याला उभारी देणारे काम करत रहा. परमेश्वर सतत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व तुम्हाला एक निराळंच मानसिक तसेच आत्मिक समाधान मिळेल. धन्यवाद, विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णीी, पुणे.

    उत्तर द्याहटवा